Badlapur : बदलापूर अत्याचार प्रकरणी एका तरुणीला अटक, नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Badlapur : बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली.
घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बदलापुर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं आणि संपूर्ण दिवसभर रेल्वे सेवेला ठप्प केलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांचा रस्त्यावरचा विरोध संपवला.
दरम्यान, या घटनेवरून सोशल मीडियावर खोटी माहिती आणि अफवा पसरवली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई केली. बदलापुरातील अल्पवयीन पीडितेच्या प्रकृतीविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार होऊन समाजात अशांतता पसरवल्याचा आरोप एका २१ वर्षीय तरुणीवर करण्यात आला आहे. Badlapur
या घटनेवरून सोशल मीडियावर खोटी माहिती आणि अफवा पसरवली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई केली. बदलापुरातील अल्पवयीन पीडितेच्या प्रकृतीविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार होऊन समाजात अशांतता पसरवल्याचा आरोप एका २१ वर्षीय तरुणीवर करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा उद्रेक म्हणून बदलापूरमध्ये संबंधित शाळेवर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर, हे आंदोलक रेल्वे स्टेशनवर पोहोचले, तेथे ७ ते ८ तास आंदोलकांनी बदलापूरहून जाणाऱ्या ट्रेन बंद ठेवल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन हे आंदोलन मोडीत काढले.
त्यानंतर, बदलापूरमध्ये संपूर्ण एक दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, इंटरनेटसेवा सुरळीत झाल्यानंतर काही जणांकडून चुकीचे मेसेज समाजमाध्यमांवर पसरवण्यात आले होते. त्यावरुन, आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.