Pune : माऊलींसाठी आली मुक्ताईची राखी!! अनेक दिवसांची परंपरा कायम, साडी चोळीची भेट…

Pune पुणे : मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर या संस्थानकडून संत मुक्ताईच्या वतीने भाऊ संत ज्ञानेदेवांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे राखी अर्पण करण्यात आली. यामुळे एक मोठी परंपरा कायम राहीली आहे.

यावेळी पहाटे नित्य पूजा व पवमान अभिषेक झाल्यानंतर सकाळी माऊलींना राखी अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकजण उपस्थित होते. बहीण भावाच्या प्रेमाचा क्षण मुक्ताई नगर यांच्या वतीने देवस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, रविंद्र पाटील व अंकीता पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली.
दरम्यान, देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी इतर कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. Pune

यावेळी प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. ज्ञानदेवांप्रमाणे निवृत्ती नाथ महाराज, सोपान काका महाराज यांनाही राख्या पाठविण्यात आल्या. यामुळे परंपरा कायम राहीली.