Maharashtra Politics : काँग्रेसचा अंतर्गत अहवाल ठाकरेंसाठी डोकेदुखी, जागा मिळणार कमी? जाणून घ्या राजकीय खेळी…

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. ठाकरे गटाने २१ जागा लढवून ९ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने जास्त जागा लढल्या तर आघाडीला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असे काँग्रेसच्या अंतर्गत अहवालात म्हटले आहे.
यावर उपाय म्हणून ठाकरे गटापेक्षा जास्त जागा लढवण्याची काँग्रेसने रणनीती आखली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. ठाकरे गटाने २१ जागा मागून घेतल्या. पण त्यांचा विजयाचा स्ट्रईक रेट ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिला. Maharashtra Politics

तसेच काँग्रेसने लोकसभेच्या १७ जागा लढवून १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा रेट चांगला राहिला. यामध्ये मुस्लिम, दलित, आदिवासी हा काँग्रेसपासून दुरावलेला घटक पन्हा काँग्रेससोबत आला आहे. यामुळे आता काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही राहणार आहे.


दरम्यान, काँग्रेसच्या या जनाधाराचा फायदा ठाकरे गटाला झाला आहे. ठाकरे गटाचा मराठी हा जनाधार मुंबई, ठाणे आणि कोकणात घटला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरे गटाने काँग्रेसपेक्षा कमी जागा लढविणे महाविकास आघाडीला सत्तेवर येण्यासाठी फायद्याचे ठरेल, असा काँग्रेसचा सर्व्हे सांगत आहे.
या अहवालात ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत ४० पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व याबाबत विचार करत आहे. ज्या जागा काँग्रेस जिंकेल, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, असे केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना सांगितले आहे.