Pune Crime : सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला ९ वर्षाच्या मुलीचा विनयभंग, खडकीत धक्कादायक घटना…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोसायटीच्या गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात थांबलेल्या ९ वर्षाच्या मुलीला किचन दाखवतो, असे म्हणून खोलीत ओढून घेऊन सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजता घडली आहे
आशिष रावत (वय ४९, रा. पड्याळवस्ती, औंध रोड, खडकी) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकणी एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी हा पड्याळ वस्ती येथील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. फिर्यादी यांची ९ वर्षाची नात शाळेत जाण्यासाठी त्यांच्या सोसायटीच्या दारात स्कुल व्हॅनची वाट पहात थांबली होती. यावेळी आशिष रावत याने तिला जवळ बोलावून तिच्या गालाचे चुंबन घेतले. Pune Crime
ती तेथून गेटचे बाहेर जात असताना त्याने तिला पुन्हा बोलावून चल तुला किचन दाखवितो, असे म्हणून तिला त्याचे खोलीत ओढून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करीत आहेत.