Nagpur : धबधब्यावर स्टंटबाजी ठरली कारण! एकाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…


Nagpur : नागपूरमधील उमरखेड येथील मकरधोकड धबधब्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) घडली आहे. धबधब्याच्या सांडव्यावर एका तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, मृत्यू झालेला तरुण आपल्या मित्रांसोबत मकरधोकड धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. त्यावेळीस त्याने मित्रांसोबत स्टंटबाजी करण्याचे ठरवले. Nagpur

मित्रांसोबत स्टंटबाजी करत असताना तो सांडव्याच्या भिंतीवर चढला आणि भिंतीवर उभा राहून स्टंटबाजी करू लागला असताना काही क्षणातच त्याचा पाय घसरला आणि धबधब्याच्या दुस-या बाजूला पडला, यात त्याचा मृत्यू झाला.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

धबधब्यावर पाण्याचा प्रवाह खूप होता. या घटनेचा व्हीडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. तरुण पाण्यात पडल्याने धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रशासनाकडून आवाहन…

सध्या धबधब्यावर वातावरणाचा आनंद लुटण्याठी ठिकठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अशातच या घटनेनंतर पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेणे आणि जीव धोक्यात जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!