माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये प्रवेश ! विधानसभूपूर्वी भाजपाला एक मोठा धक्का !


BJP : सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे भाजपाला एक मोठा धक्का बसणार आहे. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्या हस्ते शिशुपाल पटले यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

 

शिशुपाल पटले 2004 मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते आणि त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. खासदारकीनंतर त्यांनी भाजपाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले, पण केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी भाजपला रामराम केला आहे.

 

शिशुपाल पटले यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक मजबूत उमेदवार मिळाला आहे. काँग्रेस भंडाऱ्यातील तुमसर विधानसभेत शिशुपाल पटले यांना तिकीट देईल का, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. त्यांच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या ताकदीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!