Mumbai : नियतीचा दुर्दैवी खेळ, रस्त्यावरुन चालताना अचानक ५ व्या मजल्यावरुन कुत्रा ३ वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला, अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं…

Mumbai : ठाण्यातील मुंब्रामध्ये धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

ठाण्याजवळच्या मुब्रा परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे. मुलगी आईसोबत चालत होती. आई दोन पावले पुढे असताना अचानक मोठा आवाज झाला. मागे वळून पाहिलं, तर कुत्रा अंगावर पडून मुलगी जखमी झालेली.


मागून येणाऱ्या महिलेने त्या मुलीला उचलून तिच्या आईच्या हातात दिलं. आई लगेच धावतपळत बेशुद्धवस्थेत असलेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केले आहे.
नेमकं घडलं काय?
सदर घटना मंगळवारी दुपारी २ वाजता घडल्याचे समोर आले आहे. दुपारी कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळला. यादरम्यान रस्त्यावरुन आईसोबत जाणाऱ्या ३ वर्षांच्या जाणाऱ्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरचं बेशुद्ध पडते. यामुळे आई ताबडतोब डॉक्टरांकडे जाते.
कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरचं बेशुद्ध पडते. यामुळे आई ताबडतोब डॉक्टरांकडे जाते. परंतु मुलीचा दुदैवी मृत्यू होतो. कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काहीकाळ बेशुद्ध होता. परंतु थोड्यावेळाने कुत्रा जागेवरुन उठल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे.
