Daund : दौंडमधील कंपनीत वायू गळती, १४ कामगार रुग्णालयात दाखल, अनेकांना त्रास, भयंकर घटनेने सगळेच हादरले…

Daund : दौंड तालुक्यातील भांडगाव जवळील टेस्टी बाईट या कंपनीत वायू गळती झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार आज बुधवारी (ता.७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.

या घटनेत १४ कामगारांना श्वास घेण्यास उलट्या, चक्कर आणि डोळ्यांना जळजळ जाणू लागल्याने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कामगारांमध्ये ९ महिलांचा समावेश असून यातील ३ महिलांना गंभीर त्रास जाणू लागल्याने पुण्याला हलवण्यात आले आहे.
भांडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत टेस्टी बाईट हि खाद्यपदार्थाची कंपनी आहे. या कंपनीत महिला व पुरुष असे दोघेही काम करतात. बुधवारी (ता.७) सकाळी कामगार काम करीत असताना कंपनीत अचानक विषारी वायूगळती झाली. Daund

यामध्ये कंपनीत काम करणाऱ्या १४ कामगारांना त्रास जाणवू लागला. सकाळी कामगार काम करीत असताना अचानक वायू गळती झाली. कामगारांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. राज्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने कामगारांच्या जीवाचा प्रश्न उभा राहिला आहे.