Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका….


Ajit Pawar : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. पुढील ५ वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

नाशिकच्या कळवण येथे झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, पावसाचे दिवस आहेत, अजूनही काही धरणं भरायची आहेत. अजूनही आपल्याला पावसाची गरज आहे. मी सर्व देवांना प्रार्थना करतो. मागे पांडुरंगालाही प्रार्थना केली.

सर्व धरणं तुडुंब भरावी, समाधानाचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये येऊ दे. नाशिककरांना विनंती आहे की, द्राक्ष व्यापरी पैसे बुडवतात, सह्याद्री सारख्या काही संस्था आहेत यांच्याकडे द्राक्ष द्या. पवार साहेबांना दैवत मानून मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. अडीच वर्षे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. वेगवेगळ्या विचारधारा असणारे पक्ष एकत्र आले. Ajit Pawar

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. साडेआठ लाख सोलर पंप आम्ही देणार आहोत. परवा जुन्नरचे 12 बिबटे पकडले, सर्व गुजरातला पाठवून दिले. विरोधक म्हणतात सर्व गुजरातला जाते, काय जातं तर बिबटे जात आहेत. पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे अजित पवार यांनी आक्रमकपणे सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!