टँकर चालकाने केमिकल टँकर ओढ्यात ओतला ! रांजणगाव पोलिसांनी टँकर चालकाला शोधून केली अटक !!


 

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी येथून केमिकल ऍसिड भरलेला टँकर ओढ्यात सोडणाऱ्या टँकर चालकाला रांजणगाव पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.किशोर दशरथ मोरे (वय ३६, रा. भेकराईनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी जवळील गणेगाव खालसा देबील कामिनी ओढ्यात गेल्या आठवड्यात अज्ञात व्यक्तीने केमिकल सोडून दिले होते. या केमिकलमुळे ओक्यातील चलचर, मासे मरण पावले होते. तर या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गा प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला होता. विविध ठिकाणी माहिती घेण्यास सुरुवात केली होती. सदर माहिती घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे टँकळ चालक किशोर मोरे यास ताब्यात घेतले. यावेळी सदर प्रकरणा रांजणगाव एमआयडीसी येथून हायड्रोक्लोक अॅसिडने ३५ टन भरलेला टँकर सुखा केमिकल कंपनी बडोदरा गुजरात येथे नेण्यासाठी भरला होता.

परंतु टँकर चालकाने गुजरात येथे न नेता बनावट पावती करून संबंधित कंपनीस पाठवली व केमिकलयुक्त टॅंकर कामिनी ओढ्यात सोडून दिला. हा तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, संदीप जगदाळे यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!