Accident News : भरधाव वेगाने येणाऱ्या कारची १२ दुचाकींना धडक, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना..


Accident News : राज्यात अलीकडे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी रावेत बीआरटी रस्त्यावर एका कारने १२ दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाला असला तरी दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका गॅरेजमध्ये एक कार दुरुस्तीसाठी आली होती. कारचालकाने कार चालविताना येत असणा-या अडचणी मेकॅनिकला सांगितल्या. Accident News

त्यानंतर नक्की काय अडचण तसेच बिघाड आहे हे पाहण्यासाठी कार घेऊन रावेत बीआरटी मार्गावर मेकॅनिक तपासणीसाठी गेला.  म्हस्के वस्ती येथे गेल्यानंतर अगोदरच नादुरुस्त असणा-या कारचे ब्रेक लॉक झाले. Accident News

त्यामुळे कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने समोरील आणि आजूबाजूच्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर पडले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!