Pooja Khedkar : ब्रेकिंग! IAS पूजा खेडकर यांना UPSC ने दिला मोठा धक्का, गुन्हा दाखल, आता उमेदवारीही रद्द होण्याची शक्यता…

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे .युपीएससीकडून वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती युपीएससीच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच उमेदवारी का रद्द करू नये? यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून] बंदी घालण्यात आली आहे. Pooja Khedkar

युपीएससीनं पूजा खेडकर प्रकरणात सखोल तपास केला आहे, तपासाअंती युपीएससीनं जे निष्कर्ष काढले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.

पूजा खेडकर यांनी जास्त वेळा परीक्षा दिल्या आहेत.
युपीएससी परीक्षा नियम डावलून परीक्षा दिली
पूजा खेडकर यांनी अनेकवेळा परीक्षा दिली. जे की युपीएससीच्या नियमात बसत नाही
ओळखपत्र बदलून आणि आई वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या
ई मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली.
त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता दिवसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘पुजा खेडकर यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, माझ्यापर्यंत तक्रार आल्यानंतर योग्यवेळी योग्य ठिकाणी माझी बाजू मांडेन असे दिवसे यांनी म्हंटले आहे.
