Pune Hit and Run : पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरणाने खळबळ! दोन पोलिसांना भरधाव कारनं उडवलं, एका पोलिसाचा मृत्यू, मुंबई पुणे महामार्गावर घडली घटना…

Pune Hit and Run : पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणानंतर पुन्हा एका हिट अँड रनच्या प्रकरण समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं.

या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समाधान कोळी असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर, पी. सी. शिंदे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पुण्यात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री साधारणतः पावणे दोन वाजता हा अपघात घडला. Pune Hit and Run
खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना, समोरून वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला.