LPG Price : महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडर झाला आणखी स्वस्त, नवीन दर आजपासून लागू…


LPG Price  : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या सकाळी ६ वाजता एलपीजी सिलिंडरची किंमत अपडेट करतात. आजही एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. यामध्ये ३० ते ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

ही कपात १ जुलैपासून लागू होणार आहे. ही कपात १९ किलो व्यावसायिक गॅससाठी करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. LPG Price

सिलेंडर कुठे स्वस्त झाला?

दिल्ली ३० रुपयांनी स्वस्त, आता १६४६ रुपयांना मिळणार आहे.
कोलकाता ३१ रुपये स्वस्त आता १७५६ रुपयांना मिळेल.
मुंबईत आता ३१ रुपयांनी स्वस्तात १५९८ रुपयांना मिळणार आहे.

चेन्नई ३० रुपये स्वस्त, आता १८०९.५० रुपयांना उपलब्ध आहे.
आता पाटण्यात १९ किलोचा सिलेंडर १९१५.५ रुपयांना मिळणार आहे.
अहमदाबादमध्ये १९ किलोचा सिलिंडर १६६५ रुपयांना मिळणार आहे.

घरगुती LPG सिलेंडर?

दिल्लीत ८०३ रुपयांना उपलब्ध.
कोलकाता येथे ८०३ रुपयांना उपलब्ध आहे.

हे मुंबईत ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.
चेन्नईमध्ये ८१८.५०रुपयांना उपलब्ध आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!