महाराष्ट्र विधानसभेसाठी अमित शहा झाले अलर्ट ! पुण्यात होणार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक !!


पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शहा जुलैमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह 14 जुलै रोजी पुण्यात पक्षाच्या बैठकीला संबोधित करू शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (29 जून) ही माहिती दिली.

 

 

 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “भाजपच्या पुण्यातील बैठकीला पक्षाचे सुमारे 4,500 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आम्ही अमित शहा यांना या बैठकीला संबोधित करण्याची विनंती केली असून त्यांनी पुण्यात  येण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ही बैठक महत्त्वाची आहे. .” या वर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 

 

 

पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, आज ना उद्या नावे निश्चित होतील. मला खात्री आहे की आमचे केंद्रीय संसदीय मंडळ राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही चांगल्या उमेदवारांच्या नावांना मान्यता देईल. “”भाजपला राज्य विधानपरिषदेचे अध्यक्षपद घ्यायचे आहे, परंतु आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) इतर 11 पक्षांशी चर्चा करू.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!