Maharashtra News : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, ‘ते’ आमदार कोण?


Maharashtra News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे.

अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली.

राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह ८ आमदारांचा समावेश आहे. Maharashtra News

राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.

राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती पूढील प्रमाणे..

राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – २४ मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)

प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)

संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!