Supriya Sule : शरद पवारांनी हात जोडून एका व्यापाऱ्याला विचारले, मी इथं येऊ शकतो ना?? त्या दिवशी नेमकं काय घडलं? सुप्रिया सुळे यांनी सांगितला किस्सा…


Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा एक किस्सा सांगितलं ज्याची सध्या जोरदार सुरु आहे. त्या दिवशी शरद पवार या मेळाव्याला आले होते. पवारसाहेब या ठिकाणी आले. ते व्यासपीठाच्या पायऱ्या चढत होते.

त्यावेळी बारामतीतील ज्या व्यापाऱ्याने त्यांना हा मेळावा घेऊ शकत नाही असे स्पष्ट केले होते, त्यातील एका व्यापाऱ्यापुढे हात जोडून शरद पवारांनी त्यांना विचारले की, आता तरी मी येऊ शकतो ना? शरद पवारांच्या त्या वाक्याने ‘मला प्रचंड दुःख झाले’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेमकं घडलं काय?

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत विविध घटकांना भेटत संवाद साधत होते. या संवादात मिठाचा खडा पडला तो बारामतीच्या व्यापाऱ्यांचा. बारामतीच्या व्यापाऱ्यांनी अजित पवारांसोबत एक मेळावा घेतला होता, पण शरद पवार यांना पत्र दिले होते ते काही कारणास्तव आम्ही मेळावा घेऊ शकत नाही.

बारामतीच्या व्यापाऱ्यांनी अजित पवारांसोबत एक मेळावा घेतला होता, पण शरद पवार यांना पत्र दिले होते ते काही कारणास्तव आम्ही मेळावा घेऊ शकत नाही. शरद पवारांना हे पत्र जिव्हारी लागले.

शरद पवारांनी व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमाला जोडून असलेल्या वकिलांच्या बोलावलेल्या मेळाव्यात याची पहिल्यांदा जाहीर वाच्यता केली आणि संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली आहे. ज्या शरद पवारांच्या जीवावर इथली बारामतीची बाजारपेठ सुरुवातीला उभी राहिली, त्याच शरद पवारांसोबत संवाद साधायलाही व्यापारी नको म्हणतात, हे सामान्य माणसालाही पटले नाही. याचा व्हायचा तो परिणाम झाला. Supriya Sule

लोकांमध्ये नाराजी वाढली. या नाराजीची तीव्रता एवढी वाढली की, बारामतीतील विरोधी पक्षनेत्याने आणि मनसेच्या प्रदेश पातळीवरील नेत्याने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची नवीच स्वाभिमानी संघटना उभी केली. या नव्या संघटनेने मात्र शरद पवारांना सन्मानाने बोलवले.

त्यावेळी मात्र बारामतीतील काही व्यापारी पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शरद पवारांसोबत हा मेळावा नव्याने घेतला. याची आठवण आता येण्याचं कारण, म्हणजे आज सुप्रिया सुळे या बारामतीत आभार मानण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या भाषणात त्यांनी हा भावनिक सांगितला आणि उपस्थित भावनिक झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!