Pune Crime : पुण्यात किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, भयंकर माहिती आली समोर…

Pune Crime : पोलीस लाईनमध्ये कशाला येता असे म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना बुधवारी (ता.५) दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वारगेट पोलीस लाईन येथे घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे
याप्रकणी सोमनाथ राजाराम शेडगे (वय.४५ रा. घोरप]डे पेठ, खडकमाळ आळी, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलीस शिपाई मंगेश दिलीप कांबळे (रा. स्वारगेट पोलीस लाईन, पुणे) याच्यवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी स्वारगेट पोलीस लाईनच्या शेजारी राहण्यास आहेत. मंगळवारी (दि.4) त्यांच्या मित्राच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी कात्रज येथे गेले होते. Pune Crime
दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राची दुचाकी पोलीस लाईनमध्ये पार्क करुन त्यांच्या चारचाकी गाडीतून कात्रज येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर फिर्य़ादी व त्यांचा मित्र पोलीस लाईनमध्ये दुचाकी घेण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपी मंगेश कांबळे त्याठिकाणी आले. त्यांनी ‘तुम्ही कोण आहे’ अशी विचारणा केली असता फिर्यादी यांनी ‘आमची गाडी पार्क केली होती ती घेण्यासाठी आल्याचे’ सांगितले.त्यावेळी मंगेश कांबळे याने ‘तुम्ही इथे थांबु नका, येथुन निघून जावा’ असे सांगितले. तसेच ‘तुम्ही पोलीस लाईनमध्ये कशाला येता’ असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. तसेच हातातील स्टीलचे ताट तोंडावर मारुन फिर्यादी यांना जखमी केले.
फिर्य़ादी आरोपीच्या मागे पळाले असता आरोपीने घरातून रॉड आणला. ‘मी पोलीस आहे हे तुला माहीत आहे का’ असे म्हणून फिर्यादी यांच्या पाठीवर व डोक्यात मारुन जखमी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.