Lok Sabha Election Result 2024 : भाजपला मोठा धक्का! तेजस्वींकडून कौतुक, खर्गेंकडून संकेत, मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? नेमकं काय घडलं..

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता.

एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएचे ३०० उमेदवारही निवडून आले नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत.
तसेच काँग्रेसनेही यंदा आपली कामगिरी सुधारली आहे. तरीही इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. हा आकडा गाठण्यासाठी त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा हवा आहे. सध्या हे दोन्ही नेते एनडीएच्या समर्थनात आहेत.

तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे सर्वात मोठे किंगमेकर असल्याचं सांगितलं, त्याचवेळी खर्गे यांनी हे वक्तव्य केल्याने नितीश कुमार हे एनडीएचा गेम करणार की काय अशी चर्चा आहे. तेजस्वी यादव यांच्यामते नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत जे बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकतात. Lok Sabha Election Result 2024

त्यांच्याकडून नितीश कुमार यांना थेट इंडिया आघाडीत सामील होण्याची ऑफर देण्यात आली आहे. इतकंच नाही तर इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान,जेडीयूने ते अजूनही एनडीएसोबत असल्याचे सांगितले आहे. नितीश कुमार एनडीएसोबतच राहणार असल्याचे केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. एनडीएची बैठकही पार पडली. यानंतर नितीश कुमार म्हणाले की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, जास्त काळ थांबून राहू नये.
तर, जेडीयूने भाजपकडे सभापतीपदाची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे टीडीपीचाही त्या पदावर डोळा असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येणारा काळ हा एनडीएसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, नितीश कुमार यांना निर्णयच हे ठरवणार आहे की केंद्रात कोणाची सत्ता येणार?, तसेच याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.