Pune Accident : मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणी बडा मासा अडकला, झाली अटक, नेमकं घडलं काय?


Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी बातमी आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात टीकेची झोड उडाल्यानंतर पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे.

या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने गुरुवारी (ता.२३) चौकशी करण्यात आली. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती.

तसेच नातू अल्पवयीन असल्यााचा देखील दावा लाडोबाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता. नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी सुरेंद्र अग्रवाल यांनी केली होती.

सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. जेवढे अग्रवाल यांचे नाव प्रसिद्ध आहे तेवढेच वादग्रस्त आहे. छोटा राजनशी संबंध असल्याच आणि त्यातून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला देखील सुरु आहे.

या प्रकरणात ज्या वेळी अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या शेजारी ड्रायव्हर बसला होता गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमारने डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर दाखल करण्याची शक्यता आहे. Pune Accident

दरम्यान, या प्रकरणी विशाल अग्रवालवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे.

सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!