Uruli Kanchan : खामगाव टेक मुलगी अपहरण प्रकरणी पोलिसांकडे अद्याप धागेदोरे सापडेना! माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून मिळणार बक्षीस..!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : खामगाव टेक (ता. हवेली ) येथील एका शेतमजूराच्या १० वर्षीय मुलीच्या अपहणप्रकरणाला पाच दिवस उलटून गेले तरी अपहरणप्रकरणी पोलिसांनी अद्याप कसलेही धागेदोरे हाती लागत नसल्याने या अपहरणप्रकरणातील संक्षयित आरोपीची माहिती अथवा अपहरणप्रकरणाला बळी पडलेली मुलगीसंबंधी काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उरुळीकांचन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

या संबंधीची माहिती सांगणाऱ्यास बक्षिस देण्यात येणार आहे. उरुळीकांचनजवळील खामगाव टेक या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून सोमवार( दि.२०) एका अज्ञात व्यक्तीने पायल सुनिल खुळे (वय १० वर्षे ) हिच्या चुलत्याशी काही काळ मैत्री करुन त्याला दारु पाजून दुचाकी मोटरसायकलवर मुलीला बसवून तिचे अपहरण केले आहे.
या प्रकरणी मुलीचे वडील सुनिल बाळू खुळे (वय ३०) यांनी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गेली ५ दिवस पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा व उरुळीकांचन पोलिसांचे पथक या अपहणकर्त्या मुलीचा शोध घेत आहे. मात्र अद्याप या गुन्ह्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही. Uruli Kanchan

या अपहरण प्रकरणातील संक्षयिताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र आरोपीने अपहरण करताना कुठल्या मार्गे मुलीचे अपहरण केले यात स्पष्टता आली नाही. परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची सदोषता व पावसाळी वातावरणाने सीसीटीव्ही फुटेमधून फारसे निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी इतर मार्गाने गुन्हाचा तपास सुरू ठेवला आहे.

त्यामुळे पोलिसांनी आता अपहरणकर्त्यासंबंधित काही माहिती अथवा मुली संदर्भातील काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे मोबाईल क्र. 7776033300, उरुळीकांचन पोलिस ठाणे क्र. 020-26926287 शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.