भक्षक बिबट्या अखेर जेरबंद ! जुन्नर तालुक्यातील कालवडीत दोन बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात ..!!


पुणे : जुन्नर तालुक्यातील कालवडी येथील शेतकरी रोहिदास जनभाऊ काकडे यांच्या शेतामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे .

 

यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि , हा बिबट्या आठ वर्षांची मादी आहे . कालवडी येथे रुद्र फापाळे या आठ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता . या घटनेनंतर वनविभागाने पिंजरे लावले होते.

 

यापूर्वी कालवडी येथील पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते .सध्या पिंपळवाडी , कालवडी आणि पिंपरी पेंढार या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात आता एकूण आठ बिबटे जेरबंद झालेले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!