Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, मतदान केंद्रावर वाटत होता चिठ्ठ्या, चिठ्ठीत नेमकं काय?

Shantigiri Maharaj : महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचं शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.
नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

अशातच आज सकाळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर यांनी मतदानानंतर ईव्हीएमला हार घातला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. Shantigiri Maharaj


आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता.
दरम्यान, त्यानंतर शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हा सहकारी मतदान केंद्रावर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत होता. याप्रकरणी जनेश्वर महाराजांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हसरूळ पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.