Pune News : पुण्यात अल्पवयीन पोराला बापाने गाडी दिली, पोराने दारू पिऊन दोघांचा बळी घेतला, न्यायालयाने लगेच जामीन दिला, जीव गेलेल्यांचा गुन्हा काय?


Pune News : पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता. त्याला न्यायालयाने काही अटी आणि शर्तीनुसार लगेचच जामीन मंजूर केला.

या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टामध्ये पोलिसांनीच व्यवस्थित मुद्दे न मांडल्यामुळे संबंधित आरोपीला जामीन मिळाला आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रविवारी पहाटे ही घटना घडली असून अडीचच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचा संचालक विशाल अग्रवाल यांच्या सतरा वर्षाच्या मुलाने वेदांत अग्रवाल याने भरधाव वेगात पोर्शे कार चालवली. Pune News

विशेष म्हणजे या कारला नंबर प्लेट नव्हती. या मुलाने हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आयटी अभियंता अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात या दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेनंतर अग्रवाल हा पळून निघाला होता, परंतु स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कलम ३०४अन्वये सदोष मनुष्यधाचा गुन्हा देखील दाखल केला, मात्र घटनेवेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या बड्या बापाचा पोरगा दारू पिलेला होता.

मद्यधुंद अवस्थेत तो गाडी चालवत होता. त्यानुसार पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणीही केली, मात्र वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

अर्थात वाहन चालवण्याचे कायदे केंद्र सरकारने केले आहेत, ते अंमलबजावणीत आलेले देखील आहेत, अशावेळी १७ वर्षाच्या पोराला महागडी गाडी देऊन रात्रीच्या वेळी भरधाव चालवण्यास मुकसंमती असलेला बाप यासाठी दोष नाही का? त्याच्यावर कारवाई कधी होणार आहे? त्याच्यावरती गंभीर कलमे असलेले गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!