Avinash bhosale : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी जामीन मंजूर, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Avinash bhosale : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टानं हा जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सीबीआयच्या खटल्यामध्ये भोसले यांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. तर मात्र, आणखी एका केसमध्ये जामीन होणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी २६ मे २०२२ रोजी सीबीआयने अटक केली होती. Avinash bhosale
प्रकरण काय आहे?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भोसले हे तुरुंगात आहेत. येस बँक आणि डिएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती. अनियमती कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहेत.

त्यांनी काही महिन्यांपूर्वी देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज शुक्रवारी अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.