Crime News : मुलींना इंजेक्शन दिलं, दारू पाजून लॉजवर नेलं, नराधमांनी अंगाचे लचके तोडून…; घटनेने राजगुरूनगर हादरलं


Crime News : खेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी हवस भागवण्यासाठी तीन युवकांनी ओळखीच्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन ड्रगचे इंजेक्शन दिले.

तसेच लॉजवर नेऊन दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींलवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या भयानक आणि किळसवाणा प्रकारामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत तिघा आरोपींविरोधात खेड पोलीसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुख्य सुत्रधार फरार आहे. यामध्ये फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सुत्रधार असुन त्याच्याकडून आत्तापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले? याबाबतीत पोलिस माहिती घेत आहेत. या घटनेने मात्र खेड तालुका हादरला आहे.

घटनेनंतर सकाळी नशेत झिंगून घरी परत आल्यावर मुलींच्या पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडे धाव घेतली. राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेली आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले, मुली आहेत. Crime News

दरम्यान, याबाबत काही महत्त्वाचा तपास सुरू आहे. सर्व प्रकारा बाबत सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येईल. असे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!