पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये जेलमध्ये टोळीयुद्ध ; दोन जागीच ठार…!

चंदीगड : पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. तरनतारन येथील गोइंदवाल साहिब मध्यवर्ती कारागृहात रविवारी टोळीयुद्ध झाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील आरोपी मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग यांचा या टोळीयुद्धात मृत्यू झाला.
दुसरीकडे, भटिंडा येथील रहिवासी केशव गंभीर जखमी आहे. तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. टोळीयुद्धानंतर जखमींना कडेकोट बंदोबस्तात तरणतारणच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगजित सिंग यांनी सांगितले की, जेलमधून आणलेल्या तीन जखमींपैकी दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. तिसर्याची प्रकृती चिंताजनक असताना त्याला अमृतसर येथील गुरु नानक देव हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्यात आले आहे.
Views:
[jp_post_view]