Pune Crime : शेतमजूराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले, गुन्हा दाखल…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत.
तसेच मंचर येथील शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी घनश्याम हरिदास निकम रा. नागपूर याच्याविरोधात पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शेतमजूर कुटुंब नागापूर गावच्या हद्दीत निकम यांच्या शेतामधील खोलीत राहत होते. तिचे कुटुंब आरोपीच्या शेतात काम करीत होते. Pune Crime


घनश्याम हरिदास निकम याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नागापूर गावचे हद्दीत शेतातील रूममध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंधरा वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केला आहे.
मुलीने प्रतिकार केला, तरीही निकम याने अत्याचार केला आहे. सदर पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर घनश्याम हरिदास निकम (रा. नागापूर) याच्याविरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील करीत आहेत.