Gold Silver Rate : सोन्याच्या दरवाढीला मोठा ब्रेक! दरात ३३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या सुवर्णसंधी…

Gold Silver Rate : सोने – चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे ऐन लग्नसराईत नागरिकांचं बजेट काहीसे कोलडमडले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.

त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला अन् सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू झाली. उच्चांकी दर गाठलेल्या सोन्याच्या दरात आतापर्यंत ३३०० रुपयांनी घसरण झाली आहे.
त्यामुळे आता सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? सोन्याचे दर आणखी कमी होणार की वाढणार? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत. जाणून घेऊयात याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे. Gold Silver Rate

तसेच केडिया ॲडव्हायजरीच्या मते, एप्रिल महिन्यात सोन्याचा दर ६८,६९९ रुपये प्रति १० ग्रॅमपासून सुरू झाला आणि याच महिन्यात सोन्याचा उच्चांकी दर ७३,९५८ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. तर सोन्याचा किमान दर ६८,०२१ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला. म्हणजेच एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात ३.९३ टक्क्यांनी घसरण झाली आहे .

सोन्याचे दर वाढण्यासाठी कारणीभूत घटक…
सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये भौगोलिक राजकीय तणावात वाढ, केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीत झालेली वाढ, जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ, सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक सोने-चांदीत गुंतवणूक करत आहेत आणि लग्नसराई सुरू असल्याने सुद्धा सोने खरेदीत मोठी वाढ होत आहे.