Sushma Andhare : चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, त्यांना त्यातलं अफाट ज्ञान! चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध…


Sushma Andhare पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. राज्याच्या राजकारणात एक नवा वाद समोर आला आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

शिवसेना उबाठा पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

त्यावरुन, आता शिवसेना आणि भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असून वाघ यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला, आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. Sushma Andhare

जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचे शोषण केले, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केलं नाही.

२५०० पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केला, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा, अशा तीव्र संतापजनक शब्दात प्रियंका चुतर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!