Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! पुण्यात राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय घडलं?


Loksabha Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पुण्यात अंतर्गत गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आली आहे. यामुळे याठिकाणी नाराजीनाट्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अनेकदा मुख्यमंत्र्यांकडून शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना टाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नाना भानगिरे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. आता ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

पक्ष सोडण्याच्या निर्णयावरती पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरु आहे. आज एक बैठक घेऊन शिवसेना शिंदे गट सोडण्याच्या निर्णयावर नाना भानगिरे समर्थक चर्चा करणार आहेत. त्यांनी असा निर्णय घेतला तर शिंदे यांना हा मोठा धक्का असणार आहे. Loksabha Election 2024

यामुळे आता ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री शिंदेची संघटनात्मक पातळीवर डोकेदुखी वाढली आहे. यामुळे आता ते येणाऱ्या काळात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे शहराध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. यासाठी मोठी जय्यत तयारी नाना भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरे यांच्या घरी जाणं टाळले. यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले.

तसेच यापूर्वीही अनेकदा नाना भानगिरे यांना टाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नाना भानगिरे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!