Salman khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी! अटकेत असलेल्या एका आरोपीचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर..


Salman khan : अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अटकेत असलेल्या या आरोपीने आत्महत्या केली.

गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता. Salman khan

सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.

या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!