Kapil Sharma : द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो च्या एका एपिसोडसाठी कपिल किती घेतो पैसे? आकडा वाचून धक्काच बसेल…

Kapil Sharma : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील ३० मार्चपासून सुरु झालेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. यावेळचे या शोचे वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच वर्षांनी सुनील ग्रोवर परतला आहे.
या शोमध्ये सुनील ग्रोवर अन् कपिल शर्माची जुगलबंदी पाहून प्रेक्षक खूप खूश आहेत, आतापर्यंत या शोचे फक्त ५ भाग प्रसारित झाले असले तरी कपिल शर्माने त्यातून प्रचंड कमाई केली आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल शर्मा प्रचंड फी आकारत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार तो एका एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेत आहेत. या शोसाठी त्याला जवळपास २६ कोटी रुपये मिळाले आहेत.
त्यामुळेच कपिलची गणना टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कॉमेडियन आणि अभिनेत्यांमध्ये होताना दिसतेय. सुनील ग्रोव्हर जवळपास ६ वर्षांनंतर कपिल शर्मासोबत काम करत आहे. Kapil Sharma
दरम्यान, शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंग हे देखील त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हा शो १९० देशांमध्ये प्रसारित होतोय.
पहिल्या एपिसोडमध्ये कपिल शर्मा आणि त्याची टीम रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांच्यासोबत मजामस्ती करताना दिसली.