आयपीएलच्या एका सामन्यात 523 धावांची लयलूट ! विक्रमी 262 धावांचा यशस्वी पाठलाग ..!!


Punjab : आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्याची नोंद कोलकाता
नाईक राईडर व पंजाब किंग्स या सामन्यात झाली आहे. या सामन्यात पंजाबने कोलकात्याला आठ गडी व आठ चेंडू राखून पराभव करताना 262 धावांचं लक्ष्य गाठले आहे.

या संपूर्ण सामन्यात तब्बल 523 धावांचा पाऊस पडला आहे. कोलकता नाईट रायडरने पहिल्यांदा फलंदाजी करताना 262 धावा केल्या होत्या. या 262 धावांचा पाठलाग करताना पंजाब कडून प्रभसीमरण आणि जॉनी बियरस्टो यांनी जोरदार सुरुवात केली. प्रभसीमरण याने पाच षटकार आणि चार चौकारांच्या साह्याने फक्त 20 चेंडू 54 धावा केल्या, तर 9 षटकार आणि 8 चौकार लगावत जॉनी बियरस्टो त्याने फक्त 48 चेंडूमध्ये नाबाद 108 धावा केल्या.
शशांक सिंह याने अवघ्या 28 चेंडू मध्ये 68 धावा केल्या. आयपीएलच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला.