वस्ताद एक डाव राखून ठेवतो, डाव जिंकतो ! रोहित पवार यांचे वक्तव्य.. !!


Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार एकाच बगाडावर पाहून जनतेला सुखद धक्का मिळाला आहे.
कारण होते की, हिंजवडीच्या बगाड यात्रेच्या गाडीवर पार्थ पवार आणि रोहित पवारांनी एकमेकांना सांभाळून घेत हास्यवदन केलं. जरी या दोघांमध्ये फारसा संवाद झाला नसला तरी पवार कुटुंबातले दोघं एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

“आगामी निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. पवार साहेबांचं वय काढणारे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे. वस्तादाने तयार केलेल्या पैलवानाला वाटतं की आपण एकट्याने तयार झालो आहोत. पण शेवटी वस्ताद एक डाव राखून ठेवतो आणि डाव जिंकतो,” असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
Views:
[jp_post_view]