Shikhar Bank Scam : ब्रेकिंग! शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीज चिट! रोहित पवार यांना दिलासा मिळाल्याने चर्चांना उधान..!!

Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. EOW कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, अजित पवार यांच्याबरोबरच EOW ने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लोजर रिपोर्टमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये पहिला क्लोजर रिपोर्ट सादर झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर याप्रकरणी पुन्हा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आता EWO ने क्लोजर रिपोर्ट सादर करत अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना क्लीन चीन दिली आहे.

तसेच २००१ ते २०११ या काळात शिखर बँकेने राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांना काहीच तारण न देता कर्ज दिलं होत. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता. Shikhar Bank Scam
इतकंच नाही तर अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे माणिकराव पाटील हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना ही कर्ज देण्यात आले असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता.
हा शिखर बँक घोटाळा तब्बल २ हजार ६१ कोटी रुपयांचा होता. तसेच या घोटाळ्यात सरकारी तिजोरीला २५ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. या शिखर बँकेकडून नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.