DS Kulkarni : डी. एस कुलकर्णी यांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, १६ हजार कोटींची मालमत्ता ४ बांधकाम व्यावसायिकांनी…

DS Kulkarni : गेल्या काही दिवसांपासून डी एस कुलकर्णी हे अडचणीत आले आहेत. आता याबाबत त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांन कवडीमोल भावाने विकत घेतली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
तसेच ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 16 हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप डीएसके यांनी केला आहे. याबाबत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. माझ्याकडे पैसे आहेत मी कोणाचे पैसे का बुडवू असेही ते म्हणाले.
व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. डीएसकेंनी व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका या बांधकाम व्यवसायिकांवर गंभीर आरोप केले आहे. DS Kulkarni
त्याविरोधात डीएसके सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टाने 10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली असल्याची माहिती डीएसकेंनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. माझ्या मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत.
मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ असा सवालही त्यांनी केला. 2017 मध्ये एकाच वेळी मला 32 हजार जणांनी पैसे मागितल्याचे कुलकर्णी म्हणाले. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्याचा आरोप जीएसकेंनी केला आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.