बारामतीत नणंद भावजयीचा अर्ज दाखल ! प्रचाराचा फड गाजण्याची चिन्हे !!

बारामती : बारामती मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्यांदाच बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत पार पडणार आहे. पवार कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकीला उभे राहिल्याने मतदार कोणाला निवडून देणार? या कडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे .

आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून यावेळी महायुतीकडून पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी ही गावकी भावकीची निवडणूक नसून देशाची निवडणूक आहे, देशात विकास कोण करेल. पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकासकामे केली आहेत. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, सध्या बनवाबनवी सुरू असल्याने कुणाचं ऐकू नका. पुरंदर दौंड इंदापूरसाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून कोणाचेही पाणी चोरलं जाणार नाही सगळ्यांना हक्काने पाणी मिळेल असेही अजित पवारांनी आश्वासन दिले आहे.