Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन दमदाटी करत पती-पत्नीला मारहाण, घटनेने उडाली खळबळ..


Uruli Kanchan : सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व दगडाने मारहाण करुन दोघांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुकाईवस्ती, पांढरस्थळ येथे बुधवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan

उद्धव आबासाहेब कांचन व कमल आबासाहेब कांचन (रा. दोघेहि मुकाईवस्ती, पांढरस्थळ, उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी रंजना विजय कांचन (वय. ५३, रा. मुकाई वस्ती, पांढरस्थळ. उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रंजना विजय कांचन यांची राहत असलेल्या परिसरात सामाईक विहीर आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरासमोर राहणारे उद्धव कांचन व कमल कांचन यांनी सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने व दगडाने मारहाण केली.

दरम्यान, पती विजय कांचन यांना हाताने मारहाण करुन दगडावर ढकलून देऊन दुखापत केली. याप्रकरणी रंजना कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उद्धव कांचन व कमल कांचन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!