Pune Crime : सुपरवायझरचा चाकूने भोकसून खून, पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना..

Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करत त्याला इमारतीवरुन खाली फेकून दिल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार कोंढवा परिसरातील रहेजा स्टर्लिंग सोसायटीच्या क्लाऊड नाईन जवळ मंगळवारी (ता.१६) रात्री आठ ते साडे आठ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
पंकज कुमारमोती कश्यप (वय.३५ रा. कृष्णानगर, गल्ली नंबर २, मोहमदवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंकज यांची पत्नी मीनाकुमारी पंकज कश्यप (वय.३०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महेश करंजकर यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन स्टर्लिंग सोसायटीच्या फेज सहा येथे एका ३५ ते ४० वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मार्शलद्वारे माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, प्राथमिक तपासात पंकज याचा धारदार हत्याराने भोसकून खून केल्याचे निष्पन्न झाले. इमारतीच्या ठिकाणी तो सुपरवायझर म्हणून काम करत होता. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.