Abhijit Bichukale : अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात, १९ तारखेला भरणार उमेदवार अर्ज, म्हणाले, दारू-मटण देऊन…

Abhijit Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचुकलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

अभिजित बिचुकले हे येत्या १९ एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सल्लाही बिचुकलेंनी दिला.
अभिजित बिचुकले यांनी आपली उमेदवारीचा घोषणा करताना खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे स्पष्ट केले. २००४, २००९,२०१४, २०२१९ च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. Abhijit Bichukale

आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदारराजा जागृत झाला पाहिजे असे अभिजित बिचुकलेंनी म्हटले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचकुलेंनी प्रस्थापित राजकारण्यांना लावला.

या लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करणार असल्याचे सांगत बिचुकलेने रणशिंग फुंकले. मतदार राजा जागृत आहे आणि येत्या १९ एप्रिलला अर्ज भरणार असल्याची घोषणा बिचुकलेंनी केली आहे.