Uruli Kanchan : सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय चौधरी बिनविरोध…

Uruli Kanchan उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय सर्जेराव चौधरी यांची मंगळवारी (ता. १६) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रवींद्र गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच स्नेहल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत विजय चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल चौधरी यांनी विजय चौधरी यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी संतोष गायकवाड यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तानाजी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, माजी सरपंच संध्या चौधरी, सागर चौधरी, माथाडी कामगार नेते बाळासाहेब चौधरी, एम एस चौधरी, माजी उपसरपंच रवींद्र गायकवाड, शंकर बापू कड, गणेश चौधरी, भाऊसाहेब चौधरी, भरत कुंजीर, अमित चौधरी, नानासाहेब चोरगे, राजेंद्र चौधरी, मनोज चौधरी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. Uruli Kanchan


नवनिर्वाचित उपसरपंच विजय चौधरी निवडीनंतर म्हणाले, “गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.