पुण्यात भवानी पेठेतील वखारीला आग…!


पुणे : पुण्यातील भवानी पेठेतील निशात टॉकीजजवळ मोकळ्या मैदानातील लाकडाची वखार आणि गॅरेजला आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने जीवितहानी टळली आहे.

आगीत फर्निचर व दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन अधिकारी गजानन पाथडकर, प्रदीप खेडेकर, अतुल मोहिते, केतन साठे, संदीप थोरात, प्रशांत मखरे, मंगेश मिळवणे, चंद्रकांत गावडे, चंद्रकांत आनंदास, दिगंबर बांदिवडेकर, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुधीर नवले, चंदू मेनसे, अक्षय दीक्षित, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला. यामुळे मोठी हानी टळली आहे.

दरम्यान, अग्निशमन मुख्यालयातून दोन अग्निशमन वाहने आणि एक वॉटर टँकर पाठवण्यात आला. अंदाजे 3000 स्क्वे. फूट जागेत लाकडाची वखार व गॅरेजमध्ये आग लागली होती.

सध्या पुण्यात आगीच्या अनेक घटना घडत आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. शहरीकरण वाढल्यामुळे रोज या घटना घडत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!