Baramati News : बारामतीत बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ, घातपाताची शक्यता, धक्कादायक माहिती आली समोर…


Baramati News : बारामती येथील एका इमारतीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

ही घटना बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील खत्री पवार इस्टेट या इमारतीमध्ये घडली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे बारामती शहरात सगळीकडे खळबळ उडाली आहे.

सचिन वाघोलीकर व सारिका वाघोलीकरअसे मृतदेह आढळलेल्यांची नावी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन वाघोलीकर व सारिका वाघोलीकर या दोघांचे मृतदेह सदनिकेमध्ये आढळून आले. एकाच्या गळ्याला व एकाची नस कापलेल्या अवस्थेत हे दोघे आढळून आले.

घटनेनंतर तातडीने पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, बारामती शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. Baramati News

सध्या माहिती घेण्याचे काम सुरू असून ही घटना म्हणजे खून, घातपात की आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासाच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!