भाजपसोबत युती,पण फडणवीस मुख्यमंत्री नको, भाजप नेत्याची पवारांवर जोरदार टीका…!

पुणे : भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ”शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते”, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

बावनकुळे म्हणाले, मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. शरद पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस भुई सपाट होईल.
त्यामुळे शरद पवारांना भाजप सोबत युती हवी होती. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते, शरद पवार हे फडणवीस द्वेशी आहेत. त्यांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको.

त्यांचा अजेंडा आहे की, फडणवीसांना विरोध करायचा. तसेच फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काहीही करू शकतात, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. यामुळे आता पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.