जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, एक अतेरिकी ठार..

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात माहिती दिली की, सुरक्षा दलांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला.
दहशतवाद्याला केले ठार..
लष्कराच्या जवानांनी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील सबुरा नाला रुस्तम येथे नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान घुसखोरांनी गोळीबार सुरू केला, त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले.

काल राजौरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद दिसल्याच्या माहितीवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली होती, यामुळे दहशतवाद्यांचा उरी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.