Loksabha Election : ठरलं! धाराशिवमधून विक्रम काळे तर नाशिकमधून ‘हे’ असतील महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदारांना धक्का….


Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.

यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबते सुरु होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव व नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे.

तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. चार वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी या दोन उमेदवारांचे नाव घोषित केले जाणार आहेत. Loksabha Election

महायुतीमध्ये धाराशिव, नाशिक हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. या जागेवर असलेला तिढा रविवारी रात्री झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धाराशिव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार फायनल करण्यात आले आहेत.

दरम्यान, धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते.

यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण उपस्थित होते. आज सोमवारी ४ वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा उमेदवाराची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!