LPG Cylinder : निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा! सिलेंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवीन दर..


LPG Cylinder : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे आणि यासोबतच एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे सत्र सुरू असून त्याआधी एलपीजी च्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

आज गॅस सिलेंडरच्या दरात ३० रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे.१९९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता ३०.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. LPG Cylinder

मागील तीन महिन्यापासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा भडका उडाला होता. मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर २५.५० रुपयांनी वाढले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात १४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर १.५० रुपयांनी महागला होता. आता तीन महिन्यानंतर एलपीजी स्वस्त झाला आहे.

गॅस सिलेंडर कुठे, किती रुपयांनी झाला स्वस्त?

दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर ३०.५० रुपयांनी कमी झाले आहेत.
कोलकात्यात गॅस सिलेंडरच्या किमती ३२ रुपयांनी कमी झाल्या

मुंबईत गॅस सिलेंडरचे दर ३१.५० रुपयांनी कमी झाले आहेत.
चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमती ३०.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत.

दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडर म्हणजे १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८. ५० रुपये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!