Akola News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

Akola News : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे.
अशातच आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हायकोर्टाने अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले असल्याने ही जागा रिक्त झाली होती. विशेष म्हणजे या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. पण आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ही निवडणूक रद्द केली आहे.
समजा महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाली तर त्याचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर चारच महिन्यांचा कार्यकाळ तिथं निवडून आलेल्या आमदाराला मिळेल. Akola News
पण यासाठी निवडणूक खर्च करणं आणि सुरक्षा यंत्रणा राबवणं हे निरर्थक आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द केली आहे.