Lok Sabha Election 2024 : मोदी विरूध्द तिसऱ्यांदा भिडणार काँग्रेसचा बाहुबली


Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून काल ४६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सर्वात महत्वाचे नाव म्हणजे अजय राय. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अजय राय यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने अजय राय यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. राय यांना त्यांच्या भागात बाहुबली म्हणून ओळखले जाते.

आरएसएसच्या मुशीत वाढलेले एबीव्हीपी, भाजप, समाजवादी पार्टी असा प्रवास करून काँग्रेसमध्ये आलेले अजय राय सध्या उत्तर प्रदेश काँग्रेसचा मोठा चेहरा आहेत. या निवडणुकीत सपा आणि काँग्रेस आघाडी असून वाराणसी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.

…तर होईल पराभवाची हॅटट्रिक
पंतप्रधान मोदी विरूध्द अजय राय अशी लढत तिसऱ्यांदा होणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत राय यांना केवळ ७५ हजार ६१४ मतं मिळाली होती. त्यांचा तब्बल पाच लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी अरविंद केजरीवालही रिंगणात असल्याने तिहेरी लढत झाली होती.

२०१९ मध्ये राय यांना दीड लाखांहून अधिक मतं मिळाली पण जवळपास सव्वा पाच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले. आता पुन्हा ते मैदानात उतरले आहेत. यावेळीही त्यांना यश न मिळाल्यास त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक होणार आहे. हा पंतप्रधानांविरुध्दच्या लढतीचा एकप्रकारे विक्रमच ठरणार आहे. मोदींविरुध्द राय यांना विजय मिळण्याची शक्यता अजिबातच नाही. पण तसे झाल्यास हा विजय ऐतिहासिक ठरले.

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राय यांनी हर हर महादेवचा नारा दिला. त्यांनी एक्स हँडलवरून हायकमांडचे आभार मानले. तसेच लढणार आणि लढून जिंकणार, हर हर महादेव, असा विश्वास राय यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!